प्रवास...एका प्रवासाचा

वयाच्या पन्नाशीत स्वत:च्या नवीन व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवून तो यशस्वी करणाऱ्या जिद्दी उद्योजकाची यशोगाथा!
पर्यटन क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्यांसाठी परफेक्ट गाईड!

लेखक: केसरी पाटील
अनुवाद: मकरंद जोशी

केसरी टुर्सचे संस्थापक केसरीभाऊ पाटील यांचे आत्मचरित्र! असंख्य पर्यटकांना देशोदेशीच्या पर्यटनाचे दरवाजे त्यांनी खुले करून दिले. विशेषत: मध्यमवर्गीय पर्यटकांसाठी पर्यटन आवाक्यातले करून दिले. अनेक कल्पक सहली त्यांनी आखल्या. स्वत: एक आदर्श शिक्षक, प्रयोगशील शेतकरी, लोकप्रिय सहल संयोजक असणाऱ्या केसरीभाऊ पाटील यांचा जीवनप्रवास हे आत्मचरित्र उलगडते. मेहनती, कल्पक आणि प्रामाणिक उद्योजक असणाऱ्या केसरीभाऊंचा हा प्रवास नवीन उद्योजकांसाठी किंवा पर्यटन क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या युवकांसाठीही प्रेरणादायी आहे.

प्रकाशन दिनांक : 27 नोव्हेंबर 2007
पाने : 217
किंमत : ` 175