उद्योजक होणारच मी


  • उद्योजकतेची यशस्वी सूत्र सांगणारं पुस्तक
  • कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही वयात उद्योजक बनण्याचं स्वप्न पूर्ण करता येतं, हा विश्र्वास देणारं मार्गदर्शक!

लेखक: डॉ. विठ्ठल व्यंकटेश कामत

उद्योगात असलेल्या, नसलेल्या, यशस्वी उद्योजक होण्याची इच्छा असलेल्या 12 ते 82 वर्षांपर्यंतच्या प्रत्येकासाठी हे पुस्तक उत्तम मार्गदर्शक आहे. उद्योजकता ही कोणा एका व्यक्तीची मक्तेदारी नसते. तसंच उद्योजक हे जन्मजातही नसतात. ते घडवावे लागतात. उद्योजक घडण्याची प्रक्रिया कशी असावी, कोणत्या गोष्टी आवर्जून कराव्यात, कोणत्या टाळाव्यात, टीम कशी तयार करावी, सहकाऱ्यांच्या मनात सतत प्रेरक विचार जागृत कसे ठेवावेत, उद्दिष्ट साध्य कशी करावीत अशा अनेक गोष्टींचं मार्गदर्शन हे पुस्तक करते. मुख्य म्हणजे यशस्वी उद्योजक बनण्यासाठी अत्यंत आवश्यक असणारी दृष्टी हे पुस्तक देते.

प्रकाशन दिनांक : 27 नोव्हेंबर 2006
पाने : 256
आवृत्ती : 14 वी आवृत्ती
किंमत : ` 200