द कृष्णा की

  • आत्यंतिक संशोधन करून तयार करण्यात आलेली एक भव्यदिव्य रचना.
  • कटकारस्थाने आणि थरारनाट्याची रेलचेल असलेल्या या पुस्तकात कथेच्या अनुषंगाने वेदकालाचा पर्यायी अर्थही उकलून दाखवणारी कथा.
  • श्वास रोखून धरणारी उत्कंठावर्धक कहाणी.

लेखक: अश्र्विन संघी
अनुवाद: डॉ. मीना शेटे - संभू

कृष्ण... पाच हजार वर्षांपूर्वी या जादुई व्यक्तिमत्त्वाने पृथ्वीवर जन्म घेतला. मानवाच्या कल्याणासाठी त्याने कित्येक चमत्कार घडवून आणले. या नीलदेवाच्या मृत्यूमुळे मानवता नैराश्याच्या खाईत लोटली गेली असती; परंतु कलियुगात ज्यावेळी गरज भासेल, त्यावेळी नवीन अवतार धारण करून पृथ्वीवर पुन्हा येण्याचे वचन त्याने दिले आहे. आधुनिक काळात, श्रीमंत घरात जन्मलेला एक गरीब बिचारा मुलगा आपणच तो अंतिम अवतार आहोत, असे मानत मोठा होतो. मात्र तो फक्त एक खुनाची मालिका घडवून आणणारा खुनी ठरतो. इतिहास आणि वर्तमानाची सांगड घालून वाचकांना स्तब्ध करणारी, वाचकांची मती कुंठित करणारी एक धक्कादायक रचना.

ISBN NO. : 978-93-84030-07-0
प्रकाशन दिनांक : नोव्हेंबर 2014
पाने : 434
आवृत्ती : प्रथम आवृत्ती
किंमत : ` 250