मेलुहाचे मृत्युंजय

आपल्या कर्मामुळे एका साध्या माणसाने स्वत:ला महादेव म्हणजेच देवांचाही देव बनवले, त्याची विस्मयचकित करणारी कथा! शिवाच्या जीवनावरील तीन पुस्तकांपैकी हे पहिले पुस्तक! मनाची पकड घेणारी पूर्णपणे पौराणिक परंतु आधुनिक शैलीत मांडलेलीकथा.

लेखक: अमिश
अनुवाद: डॉ. मीना शेटे - संभू

‘मेलुहाचे मृत्युंजय’ - एका व्यक्तीची विलक्षण कथा.त्याच्याविषयीच्या दंतकथेने त्याला देव बनवून टाकले. ख्रि. पू. 1900 याकाळात आधुनिक भारताची ओळख सिंधु संस्कृती अशी होती. त्या काळातील रहिवासी त्याला मेलुहाची भूमी म्हणत होते. कित्येक शतकांपूर्वी प्रभू रामाने या परिपूर्ण संस्कृतीची निर्मिती केली होती. त्यावेळी सूर्यवंशींना एका प्राचीन दंतकथेचाच आधार होता. ज्यावेळी दुष्टांची दुष्कृत्ये अखेरच्या सीमेपर्यंत पोहोचतात. सारे काही संपल्यासारखे वाटू लागते, ज्यावेळी शत्रूचा विजय झाला असे वाटू लागते, त्यावेळी त्या युगाचा नायक अवतरतो. तिबेटहून स्थलांतरित म्हणून आलेला धसमुसळा, आडदांड शिव हाच तो नायक होता? पण मुळातच नायक बनण्याची त्याची इच्छा होती का? कर्तव्य आणि प्रेम यांमुळे अचानक आपल्या नियतीकडे ओढला गेलेला शिव सूर्यवंशींच्या सुडासाठीच्या युद्धाचे नेतृत्व करून दुष्टांचा संहार करेल का? एका तरुणाचा महादेवापर्यंत झालेला प्रवास अतिशय चित्तथरारकपणे या पुस्तकात मांडण्यात आलेला आहे. अतिशय उत्सुकता ताणणारे हे पुस्तक कोणीही वाचक एकदा हातात घेतल्यानंतर ते संपेपर्यंत खाली ठेवणारच नाही.

ISBN NO. : 978-93-81626-64-1
प्रकाशन दिनांक : जानेवारी 2011
पाने : 488
आवृत्ती : प्रथम आवृत्ती
किंमत : ` 295