आमचंदेखील एक स्वप्न आहे...

  • अथक परिश्रमांमधून बिकट वाटा सुकर करणाऱ्या 15 दलित उद्योजकांच्या प्रेरणादायी कथा!
  • आयुष्याच्या शाळेत सामाजिक आणि आर्थिक विषमतेचे धडे गिरवत उच्च स्थानावर विराजमान झालेल्या आजच्या काळातल्या आधुनिक एकलव्यांच्या या सत्यकथा!
  • प्रत्येकाची कहाणी वेगळी; पण संघर्ष, जिद्द, मेहनत आणि चिकाटी हा या सगळ्यांमधला समान दुवा!

लेखक: मिलिंद खांडेकर
अनुवाद: नमिता देशपांडे

वर्षानुवर्षं चालत आलेल्या वर्णभेदी समाजव्यवस्थेपुढे मान न तुकवता, कोट्यधीश होण्याचं स्वप्न पूर्ण करणाऱ्या, स्वत:च्या स्वप्नांना प्रामाणिक प्रयत्नांची आणि मेहनतीची जोड देऊन स्वत:बरोबरच सर्व समाजाला आणि देशालाही सन्मान मिळवून देणाऱ्या लढवय्यांशी साधलेला मुक्त संवाद! चप्पल-व्यवसाय, हॉटेल-व्यवसाय इथपासून तेलव्यवसाय, साखर कारखाना अशा अनेकविध क्षेत्रांमध्ये स्वत:चं स्वतंत्र अस्तित्व कसं निर्माण केलं आणि टिकवून ठेवलं हे या कथांमधून समोर येतं. या स्फूर्तिकथा जगण्याची, टिकून राहण्याची आणि सगळ्यांना घेऊन पुढे जाण्याची प्रेरणा देत राहतात.

ISBN NO. : 978-93-5080-060-7
प्रकाशन दिनांक : 15 जानेवारी 2016
पाने : 180
आवृत्ती : प्रथम आवृत्ती
किंमत : ` 255