समाजातील उगवत्या पिढीच्या सर्वंकष शिक्षणाविषयी आस्था बाळगणाऱ्या, विविध क्षेत्रातील नेतृत्त्वगुण वाढीस लागावे यासाठी प्रेरणा देणाऱ्या व सामाजिक भान जपणाऱ्या पुस्तकांची निर्मिती हे अमेय प्रकाशनाचं वैशिष्ट्य आहे.             
 
 
संवादयात्रा

ऋजुता दिवेकर... भारतातील सर्वात आघाडीची फिटनेस गुरु. लूज युवर वेट या त्यांच्या ‘नॅशनल बेस्टसेलर’ पुस्तकाचे प्रकाशन करीना कपूर यांच्या हस्ते झाले.

द Z फॅक्टर पुस्तकाचे दिमाखदार प्रकाशन.... द Z फॅक्टर हे वयाच्या 20 व्या वर्षी खिशात फक्त 17 रुपये घेऊन दिल्लीला आलेल्या एका सेल्फमेड उद्योगपतीचे कमालीचे प्रांजळ असं आत्मकथन आहे. 17 रुपये ते 17000 कोटींपेक्षाही अधिक पल्ला गाठणार्या ‘ अपना कर्म करो और अपने कर्मपर विश्वास रखो ’ हा मूलमंत्र देणार्या ‘ फादर ऑॅफ इंडियन टेलिव्हीजनच्या ’ डॉ. सुभाष चंद्रा यांच्या अलौकिक वाटचालीची संघर्षाची, व्हिजनची ती यशोगाथा आहे.

स्वप्नसुंदरी हेमा मालिनी यांच्या अधिकृत चरित्रग्रंथाच्या आवृत्तीचं प्रकाशन धर्मेंद्र यांच्या हस्ते झालं.

टीसीएस या भारतातील अग्रगण्य सॉफ्टवेअर कंपनीचे व्हाईस चेअरमन एस. रामदोराई यांनी लिहिलेल्या ‘टीसीएस स्टोरी’ पुस्तकाचे प्रकाशन महाराष्ट्राचे तत्कालिन मुख्यमंत्री मा. पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते झाले.