आई ते "सुपरमॉम"

 गर्भधारणा... बाळाचा जन्म... संगोपन... मुलांची शाळा... त्यांचे छंद... हट्ट... त्यांचा अभ्यास... प्रवास... आणि स्वत:चं यशस्वी करिअर अशा पालकत्वाच्या प्रत्येक पायरीवर आईपासून 'सुपरमॉम' बनण्यापर्यंतच्या प्रवासातल्या प्रत्येक टप्प्याविषयी करिश्मा कपूरनं सांगितलेले अनुभव!

लेखिका: करिश्मा कपूर
अनुवाद: डॉ. मीना शेटे-संभू

करिश्मा तिच्या जीवनात आईच्या भूमिकेला सर्वांत जास्त महत्त्व देते. मात्र म्हणून तिचं व्यक्तिमत्त्व याच भूमिकेपुरतं मर्यादित ठेवणं तिला मान्य नाही. एक करिअरिस्ट, आधुनिक स्त्री म्हणून जगात आत्मविश्र्वासानं वावरणारी प्रसन्न आई असं व्यक्तिमत्त्व जोपासणं तिला गरजेचं वाटतं. त्यासाठी स्वत:चा व्यायाम, आरोग्य, नोकरी-व्यवसाय आणि त्याचबरोबर घर आणि मुलं या सगळ्या आघाड्यांवर, तारेवरची कसरत करत समतोल कसा राखावा यांबद्दल स्वत:ला आलेल्या अनुभवांचं कथन करिश्मानं केलं आहे.

गर्भधारणेच्या काळातली आणि नऊ महिन्यांमधली काळजी, त्या काळासाठीचे कपडे, बाळाचा जन्म... आणि मूल शाळेत जायला लागल्यावर त्याला डब्यात काय द्यायचं, इथपासून त्याच्या मित्रमैत्रिणींशी, त्यांच्या पालकांशी सुसंवाद कसा ठेवायचा, पार्ट्या कशा द्याव्यात, मॉलमध्ये किंवा सार्वजनिक ठिकाणी मुलांच्या हट्टाला तोंड कसं द्यायचं, त्यांना शिस्त लावताना प्रसंगी कडकपणानं कसं वागायचं, आणि किशोरवयीन मुलांमध्ये झालेले बदल स्वीकारून त्यांच्याशी कसं वागायचं अशा आईपणाच्या प्रत्येक टप्प्याविषयीच्या करिश्माच्या टिप्स!

ISBN NO. : 978-93-5080-065-2
प्रकाशन दिनांक : 24 फेब्रुवारी 2015
पाने : 320
आवृत्ती : प्रथमावृत्ती
किंमत : ` 300