शालेय गणित संकल्पना कोश

सर्व संकल्पनांचा अभ्यास विद्यार्थ्यांना एकत्रितपणे करता यावा, स्वयंअध्ययन करता यावं आणि गणिताकडे केवळ एक विषय म्हणून न पाहता पृथकरण करणं, विचार करणं आणि तर्कसंगती लावणं अशा क्षमता निर्माण करण्यासाठीचं साधन म्हणून त्याचा वापर करता यावा हा दृष्टीकोन वाढवणारा संकल्पनाकोश! विविध संकल्पनांचे दृढीकरण करण्यासाठी गणिताच्या अभ्यासकांना उपयुक्त!

लेखक: डॉ. अ. का. वैद्य

गणित या विषयाच्या अध्ययनामुळे एक विशिष्ट प्रकारचा दृष्टीकोन तयार होऊन विश्र्लेषण करण्याची दृष्टी विकसित होते. या विषयाचं आकलन होण्यासाठी विद्यार्थ्यांना पाठ्यांश, संकल्पना, तत्वं, गणिताची भाषा, शब्दांचे विशिष्ट अर्थ व या सर्वांचा संबंध माहिती असणं गरजेचं असतं. गणिताच्या अध्ययनामध्ये स्वयंअध्ययन फार महत्त्वाचं असतं. स्वयंअध्ययन करताना विद्यार्थी स्वत:च्या गतीनं आणि पेलवेल अशा पद्धतीनं आपल्या सोयीच्या वेळात अभ्यास करू शकतात. त्यासाठी संकल्पनाचं एकत्रीकरण असलेलं पाठ्यपुस्तकांशिवायचं पुस्तक विद्यार्थ्याला उपयुक्त ठरतं.

गणिताचा अभ्यास शृंखलाबद्ध संकल्पनांनी युक्त असल्यानं एखादा दुवा जरी कच्चा राहिला, तरी परिणामी गणितात नापासांची संख्या वाढते. हे टाळण्यासाठी संकल्पना समजणं, त्यांचं आकलन होणं, त्या दृढ होणं आणि वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये या संकल्पनांचा वापर करता येणं महत्त्वाचं ठरतं. त्यासाठी 'शालेय गणित संकल्पनाकोश' करण्याची गरज होती. ती पूर्ण करण्याचा प्रयत्न डॉ. अ. का. वैद्य यांनी केला आहे. लेखकानं प्रत्यक्ष अनुभवांवर आधारित पुस्तकाची निर्मिती केली आहे. त्यासाठी त्यांनी अनेक संदर्भग्रंथ, गणिती ज्ञानकोश, शासकीय-अशासकीय पारिभाषिक शब्दसंग्रह यांचा आधार घेतलेला आहे.

प्रकाशन दिनांक : 26 ऑक्टोबर 2001
पाने : 344
आवृत्ती : प्रथमावृत्ती
किंमत : ` 252
Add to Cart