शपथ वायुपुत्रांची

शिवावरच्या तीन पुस्तकांच्या मालिकेतलं तिसरं पुस्तक!
अमर चित्रकथांप्रमाणेच शिवाच्या जीवनावरच्या तीन भागांच्या पुस्तकांच्या मालिकेत पुराणकथांना मसालेदार वळणांच्या गतिमान थरारकथा बनवून सादर केलं आहे. शिवाविषयीच्या पारंपरिक कथांमधल्या पात्रांना, पृथ्वीवर वावरणाऱ्या खऱ्याखुऱ्या पात्रांच्या स्वरूपात रंगवलं आहे. ही एक तरल प्रेमकथा आहे.

लेखक: अमिश
अनुवाद: डॉ. मीना शेटे-संभू

शिव आपल्या सैन्याची जुळवाजुळव करत आहे. तो पंचवटी या नागांच्या राजधानीत जातो आणि अखेरीस त्याला सैतानाचा शोध लागतो. ज्या पुरुषाच्या नुसत्या नावानंच बलाढ्य योद्धयांनाही कापरं भरतं, त्या आपल्या खऱ्या शत्रूच्या विरोधात पवित्र युद्ध करण्यासाठी नीळकंठ तयारी करतो.
तुंबळ युद्धाच्या मालिकेच्या उद्रेकानं भरतवर्ष हादरून जातो. कित्येक जण मृत्यू पावतात. मात्र कितीही किंमत मोजावी लागली, तरीही शिवाला अपयश कदापि येता कामा नये. त्याला ज्यांनी कधीच साहाय्य देऊ केलेले नसते, त्या वायुपुत्रांकडे तो अत्यंत निराशाग्रस्त परिस्थितीत जातो.
तो यशस्वी होतो का, आणि सैतानाला प्रतिबंध करण्याची खरी किंमत कोणती असते, भरतवर्षासाठी ती काय असते, आणि शिवाच्या आत्म्याला कोणती किंमत मोजावी लागते, या गूढ प्रश्नांची उत्तरं देणारं पुस्तक!

ISBN NO. : 978-93-84030-04-9
प्रकाशन दिनांक : मार्च 2014
पाने : 684
आवृत्ती : प्रथमावृत्ती
किंमत : ` 395