उडणाऱ्या लामांचा प्रदेश आणि हिमालय प्रवासातील सत्यकथा

भारतीय हिमालयातल्या काश्मीर ते अरुणाचलपर्यंत दहा जागा निवडून प्रत्येकी एक, अशा दहा गोष्टी या पुस्तकात लिहिल्या आहेत. प्रत्येक गोष्टीत त्या ठिकाणाविषयी आणि लेखकाला तिथे भेटलेल्या स्थानिक लोकांविषयी लिहिलं आहे. या गोष्टींबरोबरच लेखकानं भेट दिलेल्या स्थळांविषयीची माहिती, तिथलं समाजजीवन, तिथला बदलता इतिहास हे सगळं ओघानं आलंच आहे.

लेखक: गौरव पुंज
अनुवाद: प्रा. रेखा दिवेकर

थंड हवेची ठिकाणं, मॉल, रोड्स आणि ठरावीक 'पॉइंट्स' यांपलीकडेही हिमालयाचं एक वेगळं स्वरूप आहे. हिमालय- जिथे हिरव्यागार, विस्तीर्ण कुरणांवर फुलांचे ताटवे फुलतात, झरे झुळूझुळू वाहतात, हिमनदीचं दर्शन होतं आणि पर्वतरांगा पार करून जादुई प्रदेशात प्रवेश करता येतो, जिथे उडणारे लामा तुम्हांला भेटू शकतात....
आणि हो, तलावाच्या काठांवर पेडल बोट्स अभावानंसुद्धा सापडत नाहीत. हाच खरा हिमालय आहे. तुमच्या-आमच्यासारख्या सामान्य लोकांच्या इथल्या प्रवासात घडलेल्या गोष्टी या पुस्तकात आहेत.
जेव्हा तुम्हांला कुटुंबीयांसमवेत सुट्टी घालवायची असेल, साहसी ट्रेकवर जायचं असेल किंवा आत्मशोधाच्या दिशेनं एकट्याला भ्रमंती करायची असेल, तेव्हा हिमालयातल्या काश्मीर ते लडाख, हिमाचल, गढवाल, कुमाऊँ, सिक्कीम, अरुणाचल या विविध भागांमधल्या गोष्टी एखाद्या नवीन ठिकाणी जाण्याचा पर्याय म्हणून तुम्हांला उपयोगी पडतील. भारताची टॉप फिटनेस प्रोफेशनल ऋतुजा दिवेकर हिनं या पुस्तकात एक प्रकरण लिहिलं आहे. ट्रेक का करावा, ट्रेकचे शरीरावर होणारे परिणाम, ट्रेकचे फायदे मिळवण्यासाठी तिथे काय आहार घ्यावा अशा विविध पैलूंवर या प्रकरणात प्रकाश टाकला आहे.

ISBN NO. : 978-93-5080-048-5
प्रकाशन दिनांक : 17 मार्च 2014
पाने : 200 + 16 (रंगीत छायाचित्रांची पाने) = 216
आवृत्ती : प्रथमावृत्ती
किंमत : ` 250