ज्योतिपुंज

कुशल प्रसारक, कुशाग्र राजकारणी, सामाजिक चिंतन घडविणारे तसेच हिंदी, पंजाबी , गुजराती, मराठी, इंग्रजी अशा अनेक भाषेत लेखन करणारे पंतप्रधान मा.श्री. नरेंद्रजी मोदी यांची संस्कारयात्रा. जीवनाचा प्रत्येक क्षण आणि शरीराचा प्रत्येक कण मातृभूमीच्या सेवेत अर्पण करणाऱ्या समाज शिल्पकारांचे चित्रण.

लेखक: पंतप्रधान मा.श्री. नरेंद्र मोदी
अनुवाद: रवींद्र दाणी

सरस्वतीचे साधक : पंतप्रधान मा.श्री. नरेंद्र मोदी
पंतप्रधान मा.श्री. नरेंद्र मोदी म्हणजे विविधतांचा विहंगम संगम. 
"माझ्या या संस्कारयात्रेदरम्यान मला जगाच्या नजरेत अतिशय लहान पण प्रत्यक्षात महान व्यक्तिमत्त्वांजवळ जाण्याची संधी मिळाली. त्यांचे प्रेम, त्यांचे सान्निध्य माझ्या संस्कारयात्रेसाठी प्रेरणास्त्रोत ठरले. या नावांची यादी फार मोठी आहे. कोणतीही, कशाचीही अपेक्षा न करता जीवन समर्पित करणाऱ्या या उज्ज्वल परंपरेची फारच कमी लोकांना माहिती आहे . जीवनाचा प्रत्येक क्षण आणि शरीराचा प्रत्येक कण मातृभूमीच्या सेवेत अर्पण करणाऱ्या अशा समाज शिल्पकारांना क्वचितच स्मरण केले जाते. पण त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सुगंध आजही दरवळत आहे. अशा प्रेरणास्त्रोतांचे स्मरण उर्जास्त्रोत ठरतो. अंतर्मनाच्या आनंदासाठी, सर्वांच्या सुखासाठी या समाजशिल्पकारांच्या जीवनातील सुगंधाला शब्दांच्या ओंजळीत साठवून पुस्तकरुपात अभिव्यक्त करण्याचा एक विनम्र प्रयत्न केला आहे." - पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदी

ISBN NO. : 978-81-907294-0-6
प्रकाशन दिनांक : नोव्हेंबर 2008
पाने : 272
आवृत्ती : 2
किंमत : ` 295