सबका साथ, सबका विकास

मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी ‘सबका साथ, सबका विकास' ही घोषणा देत टीम इंडियाची संकल्पना मांडली. विकास ही लोकचळवळ झाली पाहिजे, ती होण्यासाठी काय केले पाहिजे ह्याचा विचार त्यांच्या भाषणांमधून स्पष्ट होतो. अशा वाचनीय भाषणांचा संग्रह.
रेडिओचा वापर करुन ‘मन की बात' या अभिनव उपक्रमातून करोडो देशवासियांशी एकाच वेळी संवाद साधत नवे विषय, नव्या संकल्पना, त्या प्रत्यक्षात आणण्याचा कृती आराखडा लोकांसमोर मांडला, त्याचे पुस्तकरूप.

लेखक: पंतप्रधान मा.श्री. नरेंद्र मोदी
अनुवाद: अजय कौटिकवार, अमित मोडक

विकासाचं मोठं स्वप्न घेऊन विचार करणं, त्याच प्रमाणं बोलणं आणि जे बोलतो ते प्रत्यक्षात कृतीत उतरवणं ही त्यांची खास वैशिष्ट्ये. गुजरातमध्ये 13 वर्ष अथकपणे कठोर परिश्रम करुन ते त्यांनी सिध्द करुन दाखवलं. नैसर्गिक आणि मानवनिर्मित अशा दोन्ही संकटांचा सामना त्यांना करावा लागला. प्रत्येक संकटावर मात करत त्यांनी गुजरातला विकासाच्या मार्गावर आणलं आणि त्यातूनच त्यांची विकास पुरुष अशी प्रतिमा तयार झाली. लोकांनीही त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि 2014 च्या लोकसभा निवडणुकीत इतिहास घडला.
थेट लोकांच्या ह्रदयाला भिडणारं अमोघ वक्तृत्व, गुजरात मॉडेलमधून सिध्द केलेलं कर्तृत्व आणि सर्व देशाला एका सुत्रात बांधणारं नेतृत्व. कर्तृत्व आणि नेतृत्वाच्या जोरावर त्यांनी देशात एका नवीन पर्वाला सुरुवात केली. सबका साथ, सबका विकास ही त्यांची घोषणा आज जगभर गाजतेय. संपर्काच्या सर्व पारंपारिक आणि अत्याधुुनिक साधानांचा वापर करत त्यांनी लोकांना सरकारशी जोडून घेतलं.
रेडिओचा वापर करत 'मन की बात' च्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधण्याचा त्यांचा उपक्रम तर अतिशय अभिनव आहे. त्यामुळं काळाच्या ओघात मागे पडलेल्या रेडिओला नवसंजिवनी मिळाली. रेडिओचा वापर असाही करता येतो हे त्यांनी दाखवून दिलं.
'सबका साथ, सबका विकास' ही घोषणा देत त्यांनी 'टीम इंडिया’ची संकल्पना मांडली. 'माझ्या या टीम इंडिया संकल्पनेत देशातला प्रत्येक नागरिक आहे ' असं ते म्हणतात.
त्यांच्या भाषणांचा आवाका पाहिला तरी थक्क व्हायला होतं. स्वच्छ भारत अभियानापासून ते डिजिटल इंडियापर्यंत, मातीचं परिक्षण ते अंतराळातलं संशोधन, रामायणातलं सौंदर्य ते वाचन चळवळ, शासन ते प्रशासन अशा अनेक विषयांवरची त्यांची भाषणं ही मुळातूनच वाचण्यासारखी आणि संदर्भमूल्य असणारी आहेत.या पुस्तकातून, त्यातल्या प्रत्येक भाषणांमधून, त्यांची दूरदृष्टी आणि व्हिजन स्पष्ट होतात.
'मन की बात' असो किंवा त्यांनी केलेलं कोणतंही भाषण हे देशप्रेम आणि विकसित भारताच्या स्वप्नांनी भारावलेलं असतं. त्यात भविष्याचा वेध आहे. वर्तमानाचं भान आहे आणि भूतकाळातून घेतलेला धडाही. त्यामुळे देशाच्या विकासात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या, एकविसाव्या शतकातल्या संपन्न आणि बलशाली भारताचं स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येकाला हे पुस्तक बळ आणि प्रेरणा देणारं आहे.

Copies will be available from 31st August 2016

ISBN NO. : 978-93-5080-095-9
प्रकाशन दिनांक : 15 ऑगस्ट 2016
पाने : 352
आवृत्ती : प्रथमावृत्ती
किंमत : ` 450