विचार बदला .... यशस्वी व्हा !

क्वालिटी मॅनेजमेंट, वर्कप्रोसेस इम्प्रूव्हमेंट, ऑपरेशनल एक्सलंस असे कार्पोरेट जगातले क्लिष्ट व समजण्यास अवघड शास्त्र अतिशय सोप्या व सर्वसामान्यांना समजेल अशा शब्दांत सांगणारे पुस्तकं.
लॉजिकल विचारांचा अवलंब कसा करावा हे शिकवणारे पुस्तक. सर्वच वयोगटातील व्यक्तींना जीवनातील समस्यांवर शास्त्रीय उपाय योजून मात कशी करावी हे सांगणारे पुस्तक.

लेखक: रवींद्र बागाईतकर

जीवनातल्या समस्यांवर शास्त्रीय दृष्टीकोनातून उपाय करणे आणि यशाची पुढील पातळी गाठण्यासाठी पध्दतशीर प्रयत्न करणे यासाठीचे सूत्रे या पुस्तकात आहेत. रोजच्या जीवनात सामान्य माणसाला अत्यंत उपयोगी पडणारी तत्वे अत्यंत सुलभ भाषेत कथन केलेली आहेत. उदाहरणादाखल सांगायचे तर खाली दिलेल्या किंवा त्यासारख्या समस्यांची उकल करुन दाखवलेली आहे.
1.    घरातील मुले सांगितलेले ऐकत नाहीत आणि अभ्यासाला हवा तेवढा वेळ
    देत नाहीत.
2.    मुलाचे अथवा मुलीचे करिअर काय करायचे ते ठरत नाही किंवा निवडलेल्या शाखेत बदल
    करावासा वाटतो.
3.    नोकरीत प्रमोशन किंवा यश मिळवण्यासाठी प्रयत्न कसे करावेत ते समजत नाही.
4.    नोकरी करणाऱ्या गृहिणीला नोकरी सांभाळून घराकडे इच्छा असूनही लक्ष देणे जमत नाही.
5.    रिटायर झाल्यावरच्या आयुष्याचे प्लॅनिंग कसे करावे ते नीट समजत नाही.
6.    उतारंवयात जावई किंवा सुनेबरोबर सलोख्याचे संबंध ठेवायचे आहेत पण योग्य मार्ग सापडायला
    हवाय.
7.    एखाद्या छोटया बिझनेसमनला धंदा वाढवायाचा आहे पण मार्ग नीट दिसत नाही.
8.    घराच्या बिल्डींग मध्ये किंवा सोसायटी मिटिंग मध्ये भांडणे होतात व एकमताने निर्णय
    होत नाहीत.
9.    घर नीटनेटके ठेवायचे आहे. मुलांची खोली व्यवस्थित हवी. पण ते घडत नाही आणि
    वादविवाद होतात.
10.    व्यायाम सुरू करणे होत नाही आणि सुरू झालातर त्यातले सातत्य टिकत नाही.

ISBN NO. : 978-93-5080-081-2
प्रकाशन दिनांक : 28 मे 2016
पाने : 148
आवृत्ती : प्रथम
किंमत : ` 250