बिल क्लिंटन यांच्या ‘गिव्हिंग’ पुस्तकाच्या मराठी आवृत्तीचं प्रकाशन त्यांच्याच हस्ते अमेरिकेत करण्यात आलं. सोबत अमेय प्रकाशनचे, अमेय लाटकर

अपना स्ट्रीट मुंबईतील पदपथावरील कष्टकर्‍यांनी स्वत:च्या हक्काच्या घरासाठी दिलेल्या लढ्याची कथा. फ्रेंच पत्रकार ज्युलियन हॉलिक यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या इंग्रजी व मराठी आवृत्तीचं प्रकाशन मॅगॅसेसे पुरस्कार प्राप्त जॉकीन अर्पूथम यांच्या हस्ते झालं.

पोलिस रिफॉर्मस इन इंडिया पोलिस दलाच्या आधुनिकीकरणासंबंधी राज्याचे माजी जॉईंट डीजीपी जयंत उमराणीकर यांच्या अभ्यासपूर्ण पुस्तकाचं प्रकाशन तत्कालीन गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्या हस्ते झालं.

स्थळ : हॉलॉकॉस्ट मेमोरियल, जेरुसलेम, इस्त्राईल द अदर सिंडलर्स! दुसर्‍या महायुद्धात 2500 ज्यू मुलांचा जीव वाचवणार्‍या इरेना सेंडलर या पोलंडमधील महानायिकेची जीवन कहाणी. या पुस्तकाची आंतरराष्ट्रीय माध्यमांनीही दखल घेतली. ॲमेझॉनच्या जागतिक स्तरावरील टॉप 10 इन्स्पायरिंग पुस्तकांच्या यादीत हे पुस्तक गेलं.