हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते ज्येष्ठ उद्योजक बी. जी. शिर्के यांच्या ‘क्रुसेड’ या आत्मचरित्राचं प्रकाशन.

थिंक प्युअर... दाजीकाका गाडगीळ यांच्या आत्मचरित्राचं फ्रँकफर्ट बुक फेअर, जर्मनी येथे प्रकाशन.

भाऊसाहेब संतुजी थोरात मेमोरियल लेक्चर महाराष्ट्रातील खेड्यापाड्यांतील युवकांना मार्गदर्शन करण्यासाठीचा अमेय प्रकाशनाने सुरु केलेला हा वैचारिक प्लॅटफॉर्म... थोर स्वातंत्र्यसैनिक व ‘अमृतमंथन’, ‘अमृतगाथा’ या पुस्तकांचे लेखक आदरणीय कै. भाऊसाहेब थोरात यांच्या स्मरणार्थ अमेयतर्फे वार्षिक लेक्चर सुरू केलेले आहे. आयआयएम अहमदाबादचे प्रो. अनिल गुप्ता, डॉ. रघुनाथराव माशेलकर, यांच्यासारख्या दिग्गजांची व्याख्याने आयोजित केलेली होती. या व्याख्यानसत्रांतर्गत ग्रामीण भागातील तरुणांना देशातील विविध क्षेत्रातील विचारवंतांना प्रत्यक्ष ऐकण्याची संधी उपलब्ध करुन दिली जाणार आहे.

7, रेस कोर्स रोड, नवी दिल्ली पंतप्रधान मा. नरसिंहराव यांना ‘समग्र काका’ या कै. काकासाहेब गाडगीळ यांच्या पुस्तकांचा संच देताना.