लोकनेते कै. भाऊसाहेब थोरात यांनी लोकचळवळीच्या माध्यमातून सुरु केलेल्या दंडकारण्य मोहिमेची कथा पुस्तकरुपात अमेयने शब्दबध केली. या पुस्तकाचे प्रकाशन तत्कालिन राष्ट्रपती मा. प्रतिभाताई पाटील यांनी केले. या प्रसंगी मा. बाळासाहेब थोरात, सत्यजित तांबे, अमेय लाटकर. या पुस्तकाची संयुक्‍त राष्ट्रसंघानेही दखल घेतली आहे.

डॉ. पांडुरंग खानखोजे क्रांतिकारी कृषीशास्त्रज्ञ आणि गदर चळवळीचे एक संस्थापक. त्यांच्या चरित्रग्रंथाचे प्रकाशन मेक्सीकोच्या भारतातील दूतावासाचे कल्चरल ऍटेची श्री. कॉर्नेडो टोस्टाडो यांच्या हस्ते झाले. सोबत सावित्री साहानी (लेखिका व डॉ. खानखोजे यांची कन्या), अनुवादक सुहास फडके.

सहकाराच्या माध्यमातून संगमनेर तालुक्याचा चेहरामोहरा बदललेल्या स्वातंत्र्यसैनिक भाऊसाहेब थोरात यांच्या ‘अमृतमंथन’ या आत्मचरित्राच्या प्रकाशनाच्यावेळी आपले मनोगत व्यक्‍त करताना भाऊसाहेब थोरात. डॉ. य. दि. फडके यांच्या हस्ते हे प्रकाशन झाले.

चाईल्ड कौन्सेलर अश्र्विनी लाटकर यांनी अनुवादित केलेल्या ‘मुलांवरील ताणतणाव कसा कमी करावा’ या पुस्तकाचे प्रकाशन प्रिया दत्त यांच्या हस्ते झालं.