जुलै २०१५
अमेय खरेखुरे लीडर्स

सशक्त समाज निर्मितीचा विचारवेध घेणारं मासिक.समाजातील विविध क्षेत्रातल्या कर्तृत्त्ववान मान्यवरांची चरित्रं, आत्मचरित्रं व इतर लेखन प्रकाशित करण्याची Inspiring परंपरा गेली जवळपास दोन दशकं अमेयनं जोपासली आहे आणि आता खरेखुरे लीडर्स हे मासिक म्हणजे या प्रेरणादायी पुस्तकांच्या परंपरेतला पुढचा टप्पा आहे.आपल्या भरीव कार्याने विविध क्षेत्रात सातत्यपूर्ण योगदान देत एक सशक्त आणि सुसंस्कृत समाज तयार करण्यासाठी झटणारे अनेक लीडर्ससमाजात आहेत. हे लीडर्स इतक्या मोठ्या संख्येने कार्यरत आहेत, की पुस्तकाच्या माध्यमात त्यांचं कर्तृत्व शब्दबद्ध करणं अवघड काम आहे. वेगळ्या वाटा चोखाळणार्या व समृद्ध समाज बांधणीचं स्वप्नं साकारणार्या या व्यक्तीना मानाचा मुजरा करणारं हे मासिक आहे.